प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर:महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आज, बुधवारपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला कोल्हापूर जिल्ह्यात ७३ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी ५१ हजार १५५ विद्यार्थी नोंदणी झाली आहे.ही परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने सात भरारी पथके जिल्ह्यात कार्यरत असणार आहेत शिवाय प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांच्यासह विविध अधिकारीही केंद्रांना भेटी देणार आहेत.तर राज्यातून परीक्षेसाठी १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. ३,३२० मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे. ही परीक्षा १९ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. याच दरम्यान, गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च २०२४च्या परीक्षेसाठीही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिट अधिकची वेळ वाढवून देण्यात आली आहे.परीक्षांच्या कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळस्तरावरून १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत. याचबरोबर राज्य मंडळ व नऊ विभागीय मंडळांत नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.- विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी ०२२-२७८९३७५६, २७८८१०७५ या क्रमांकांवर मदत मागू शकतात.
- परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे. विध्यार्थी परिक्षा केंद्रात परीक्षेच्या निर्धारीत वेळेच्या आधी उपस्थित असणे आवश्यक आहे.
- सकाळच्या सत्रात १०.३० वाजता तर दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थी २.३०पर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असला पाहिजे.