आजचे राशिभविष्य, 5 मार्च 2024 : या राशींचे काम वाढणार, कामात निष्काळजीपणा टाळा ! जाणून घ्या, राशिभविष्य

0
62

Aajche Rashibhavishya 5 March 2024 : मेष राशीच्या लोकांचा आजच्या दिवशी खूप खर्च होणार आहे. वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस प्रगती साधणारा राहणार आहे. तर मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तणावपूर्ण राहील. सिंह राशीची धावपळ होणार आहे. तूळ राशीच्या लोकांनी वाहनांपासून सावध राहा.

मेष – आर्थिक स्थितीची चिंता वाटेल

मेष – आर्थिक स्थितीची चिंता वाटेल

मेष राशीच्या लोकांचा आजच्या दिवशी खूप खर्च होणार आहे. तुम्ही कुटुंबीयांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करण्याचा प्लान करण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनातील लोक आपल्या प्रेमी अथवा प्रेमिके सोबत रोमांटिक डिनर डेट वर जाण्याचा विचार करण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीची चिंता वाटेल. अचानक तुमच्यासमोर अशी एखादी समस्या उभी राहील ज्यात तुम्हाला तुमच्या भावांची मदत घ्यावी लागेल. मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ – रागाच्या भरात निर्णय घेऊ नका

वृषभ – रागाच्या भरात निर्णय घेऊ नका

वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस प्रगती साधणारा राहणार आहे. तुमच्या अतिरिक्त उर्जा आहे जिचा उपयोग तुमचे एखादे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला करावे लागेल नाहीतर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही रागाच्या भरात एखादा निर्णय घेतलात तर पुढे तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो. नोकरीत तुम्ही जर एखाद्या कामात त्रास सहन करत असाल तर आज त्यात थोडा मोकळा श्वास घ्याल. आज एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळाल्याने तुम्हाला समाधान वाटेल.
आज भाग्य ९५ टक्के तुमच्या सोबत असेल. शिवा जप माळेचे पठण करा.

मिथुन – अधिक कामाचे ओझे पडेल

मिथुन – अधिक कामाचे ओझे पडेल

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तणावपूर्ण राहील. मुलांच्या करिअरच्या बाबतीत तुम्हाला थोडीशी काळजी वाटेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अधिक कामाचे ओझे टाकले जाईल. तुम्ही तुमच्या कामात आज निष्काळजीपणा करून चालणार नाही नाहीतर याचा तुम्हाला त्रास होईल. बऱ्याच काळानंतर एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण भेटेल. जर तुम्ही एखादा रखडलेला व्यापार करार आज करणार असाल तर त्यात सावधानता बाळगा.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या सोबत असेल. लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा

कर्क – खर्चांवर नियंत्रण ठेवा

कर्क - खर्चांवर नियंत्रण ठेवा

कर्क राशीच्या लोकांना आज बराच त्रास होणार आहे. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटू शकतं. जर तुम्हाला एखादा आजार जडला असेल तर आज त्यात थोडे बरे वाटेल. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थिती विषयी काळजी वाटत असेल यासाठी तुमच्या खर्चांवर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. मुलांना एखादा पुरस्कार मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण असेल आणि तुम्ही एखाद्या पार्टीचे सुद्धा आयोजन करण्याची शक्यता आहे.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या सोबत असेल. गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा

सिंह – धावपळ करावी लागेल

सिंह - धावपळ करावी लागेल

सिंह राशीचे लोक आज बरेच व्यग्र राहणार आहेत. कामाच्या ठिकाणी अशी एखादी घटना घडेल ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो. याचा तुम्हाला खूप त्रास होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला जाईल. कामासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल तेव्हाच तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या निर्णय क्षमतेचा पूर्ण लाभ मिळेल. एखादी नवी वस्तू विकत घेण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होईल.
आज भाग्य ७३ टक्के तुमच्या सोबत असेल. माता सरस्वतीची पूजा करा

कन्या – फसवणुकीपासून सावध राहा

कन्या – फसवणुकीपासून सावध राहा

कन्या राशीच्या लोकांसाठी आज संमिश्र परिणाम मिळणार आहेत. तुम्ही तुमच्या रखडलेल्या कामांच्या बाबतीत थोडे चिंताग्रस्त असाल. याविषयी तुम्ही तुमच्या मित्रांशी चर्चा कराल. कामाच्या ठिकाणी कोणी तुम्हाला फसवू शकतं. त्यांच्यापासून तुम्हाला सावधान राहावे लागेल. तुम्ही तुमच्या कामापेक्षा इतरांच्या कामात उगीच लक्ष घालाल ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. तुम्ही पूर्वी घेतलेल्या एखाद्या निर्णयाचा तुम्हाला पश्चात्ताप होईल. जर कुटुंबातील वडिलधारे लोक तुम्हाला काही मार्ग दाखवत असतील तर त्यावर चालणे तुमच्यासाठी श्रेयस्कर ठरेल.
आज भाग्य ६२ टक्के तुमच्या सोबत असेल. पिवळ्या वस्तूचे दान करा

तूळ – वाहनांपासून सावध राहा

तूळ – वाहनांपासून सावध राहा

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कौटुंबिक जीवनातील लोक आपल्या जोडीदारासोबत काही वेळ घालवतील, त्यांचे विचार ऐकतील आणि समजूनही घेतील. खूप वेगात धावणाऱ्या वाहनांपासून तुम्हाला सावध राहिले पाहिजे नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे. तुमच्या वडिलांच्या तब्बेतीच्या बाबतीत सावध राहा नाहीतर त्यांना काही शारीरिक त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुम्चाव्र काही जबाबदाऱ्यांचे ओझे टाकतील.
आज भाग्य ७८ टक्के तुमच्या सोबत असेल. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या.

  

मकर – गुंतवणूक करा

मकर – गुंतवणूक करा

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांच्या तुलनेत चांगला ठरणार आहे. तुम्ही घरगुती मुद्द्यांवर चिंताग्रस्त असाल यासाठी तुम्हाला एखाद्या बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. जर तुम्हाला एखाद्या मोठ्या गुंतवणुकीची योजना आखत असाल तर तुम्हाला मोकळेपणाने गुंतवणूक करायला हरकत नाही. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला काही चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते. एखाद्या लहान गोष्टीमुळे तुम्ही तणावात असाल. तुमची एखादी चूक कुटुंबियांच्या समोर येऊ शकते ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या सोबत असाल. हनुमानाला शेंदूर अर्पण करा.

कुंभ – कामात अडथळे निर्माण होतील

कुंभ – कामात अडथळे निर्माण होतील

व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांना आज खूप त्रास होणार आहे. त्यांचे सहकारी त्यांच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात. यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. तुमच्या कुटुंबात नवीन पाहुण्याच्या येण्याची चाहूल लागेल ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी होईल. भाऊ बहिणीत सुरू असलेले वाद विवाद संवादातून संपुष्टात येतील. आज एखाद्या मित्र मैत्रिणीसोबत बाहेर जाण्याची योजना बनवू शकता. पण जाण्याआधी आपल्या आई वडिलांना आणि वडिलधाऱ्यांना सांगून जाणे इष्ट राहील.
७६ टक्के तुमच्या सोबत असेल. विष्णू सहस्त्र नामाचे पठण करा.

मीन – उर्जा योग्य ठिकाणी लावा

मीन – उर्जा योग्य ठिकाणी लावा

मीन राशीच्या विद्यार्थ्यांना आजचा दिवस उत्तम जाणार आहे. जर त्यांनी एखादी परीक्षा दिली असेल तर त्यांना समाधानकारक आणि आनंददायक निकाल मिळतील. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. तुमची उर्जा तुम्ही चांगल्या कामात लावणे सगळ्यात योग्य ठरेल. ती उर्जा वायफळ कामात व्यर्थ घालवू नका. याशिवाय काही सामाजिक कामातील तुमचा रसही आज वाढेल. एखाद्या गोष्टीबाबत तुमच्या आईसोबत तुमचे भांडण होईल. अशावेळी तिच्याशी बोलताना जिभेवर गोडवा ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here