हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील मानेंना पर्याय म्हणून महायुतीमधून आमदार विनय कोरेच्या नांवाची चर्चा..

0
390


प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधातील अंतर्गत विरोध आणि त्यांना मतदारसंघात होत असलेला विरोध तसेच मतदारसंघातून गायब झाल्याच्या तक्रारीमुळे महायुतीकडून पर्यायी उमेदवार शोधण्यास सुरुवात झाली आहे
गेल्या काही दिवसांपासून जी पडद्यामागून चर्चा सुरु होती त्यामध्ये नव्या उमेदवारच नाव समोर आलं आहे. महायुतीकडून आमदार विनय कोरे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची विश्वासनीय सुत्रांकडून माहिती समोर आली आहे. विनय कोरे यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असून ऐनवेळी ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार होऊ शकतात, अशी चर्चा वारणा खोऱ्यात विनय कोरेंची ताकद
दुसरीकडे विनय कोरे यांचं नाव पुढे येण्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील बेरजेचा राजकारणाचाही भाग आहे. ते स्वतः पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१९ मध्ये विनय कोरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. वारणा खोऱ्यामध्ये वारणा उद्योग समुहाच्या माध्यमातून सहकाराचं जाळं तयार केलं आहे. राजाराम कारखान्याची परतफेड म्हणून महाडिक गटाकडून त्यांना मदत होऊ शकते. महाडिक गटाची हातकणंगले आणि शिरोळ मध्येही ताकद आहे. हातकणंगलेत विद्यमान चार आमदार महायुतीमधील असल्यानेही सुद्धा फरक पडू शकतो. इतकंच नव्हे, तर धैर्यशील माने यांनी विनय कोरे यांची सुद्धा नाराजी ओढवून घेतली आहे. त्यामुळे मतदारसंघातील आडाखा पाहता धैर्यशील माने सध्या अडचणीत असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे धैर्यशील माने यांना बंडखोरीचा दणका देण्यासाठी शिवसेना ठाकरे गट ही जागा आपल्याकडे ठेवून उमेदवार न देता राजू शेट्टी यांचा मार्ग सुकर करून देईल, अशी चर्चा आहे. बदल्यात राजू शेट्टी यांची मदत विधानसभेला घेतली जाऊ शकते. त्यामुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये ऐनवेळी राजू शेट्टी यांच्याविरोधात उमेदवार बदलल्यास राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here