सासुबाईचा साखरपुडा या चित्रपटास विदर्भ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा बेस्ट फिल्म अवॉर्ड 2024

0
45

प्रतिनिधी मेघा पाटील

नागपूर येथे 3 मार्च 2024 रोजी उत्कृष्ट चित्रपट म्हणून ॲवार्ड मिळाले आहे.
बाळासाहेब गोरे (रॉकस्टार स्टुडिओ) प्रस्तुत तसेच डॉ. दिलीप आबनावे (निर्माते/दिग्दर्शक) (दिल राज फिल्म प्रोडक्शन्स् यांच्या चित्रपटास ॲवार्ड मिळाल्याने चित्रपटसृष्टीतील अनेकांकडून अभिनंदन होत आहे.
वेगळ्या विषयावरील या चित्रपटाची थिएटरमध्ये उत्कृष्ट कामगिरी चालू आहे.
आजच्या विभक्त कुटूंबातील जेष्ठ पालकांची कुचंबणा आणि त्यावर शोधलेला पर्याय सर्वांच्याच पसंतीला उतरत आहे.
चित्रपट कथा/पटकथा/संवाद बाळासाहेब गोरे यांचे असून संवाद करीता प्रदीप प्रभुणे यांची साथ मिळाली आहे.
चित्रपटाचे गाणे सर्वत्र गाजत आहेत त्यांचे संगीत संदीप डांगे यांचे असून गीतकार म्हणून सावता गवळी, राजेंद्र बोडारे, योगेश घोले, डॉ दिलीप आबनावे हे आहेत.
आशुतोष गोरे, श्रध्दा, डॉ दिलीप आबनावे, संगीता पिंगळे, सुनील नाईक, संजीवनी कोंडे देशमुख, गीतांजली डोंबे, संगीता गुणवंत, तारा डाके, डॉ. धनंजय मेहेत्रे, अरूण पटवर्धन, दिलीप हळ्याल, सुभाष भालसिंग यांच्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपट नटलेला आहे.
सासुबाईचा साखरपुडा चित्रपटाचे अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नॉमिनेशन झालेले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here