सह्याद्री व्याघ्र राखीव, वन परिक्षेत्र आंबा कार्यालयाकडून गॅस रिफील वाटप

0
106

उज्वला लाड :- आंबा प्रतिनिधी

दिनांक 29-2- 2024 रोजी वन विभागा मार्फत सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत वनपरिक्षेत्र आंबा मधील ग्राम परिस्थितीकीय विकास समिती मौजे चांदोली ( लव्हाळा ) व्याघ्र राखीव तर्फे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सदर अनुदान वनांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन होण्या कामी तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन वनावरील भार कमी करण्यासाठी देण्यात आलेले आहे.


त्यानुसार मौजे चांदोली गावात वन विभागामार्फत जनजागृती करून अवैध्य वृक्षतोड कमी करण्यासाठी स्वयंपाक गॅस 75 टक्के शासकीय अनुदान व 25 टक्के लाभार्थी अनुदान या निकषावर शासकीय नियमानुसार गॅस वाटप करण्यात आले होते.

सदर गॅस भरण्यासाठी पहिल्या वर्षी आठ व दुसऱ्या वर्षी सहा 75 टक्के अनुदान ही शासन देत आहे त्यातील चार गॅस वन विभागाकडून देण्यात आलेले आहेत.


त्यामुळे ग्रामस्थांमधून वनविभागाचे कौतुक होत आहे. वन विभाग व ग्रामस्थ यांच्यामध्ये असणारा असंतोष हि कमी झालेला दिसत आहे.
वनांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन होऊन वनावरील भार या योजनेतुन कमी होण्यास मदत होईल.


सदरचा उपक्रम मा. अमृत शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी आंबा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सागर पोवार परिमंडळ वन अधिकारी, मनीषा देसाई परिमंडळ वन अधिकारी,श्री.अरविंद पाटील वनरक्षक , अमोल वडकर वनसेवक , साहिल पाटील वनसेवक , मारुती पाटील वनसेवक, रमेश कुंभार वनसेवक यांनी राबविली. तसेच सरपंच वैशाली कांबळे , उपसरपंच कृष्णा सुतार व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here