सुपे उपबाजारात चिंचेच्या ५ हजार पोत्यांची आवक; फोडलेल्या चिंचेला भाव जास्त

0
55

हंगामातील दुसऱ्याच आठवड्यात अखंड चिंचेला ४ हजार ८५०, तर चिंचोक्यास २ हजार १०० आणि फोडलेल्या चिंचेला १० हजार ५०० प्रति क्विंटल एवढा उच्चांकी बाजारभाव मिळाला.

येथील बाजार समितीचे सभापती सुनील पवार आणि उपसभापती नीलेश लडकत यांच्या हस्ते मागील आठवड्यात चिंचेच्या बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपली चिंच स्वच्छ, वाळवून व चांगल्या पॅकिंगमध्ये आणावी. तसेच येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाचे वजन त्वरित केले जाते. त्यानंतर अकरा वाजता चिंचेचा लिलाव होताच मालाची रोख पट्टी दिली जात असल्याची माहिती उपसभापती नीलेश लडकत यांनी दिली.

सुपे उपबाजार ही चिंच लिलावासाठी प्रसिद्ध अशी जुनी बाजारपेठ आहे. त्यामुळे बारामती तालुक्यासह शिरूर, दौंड, पुरंदर, फलटण, श्रीगोंदा, इंदापूर, भोर इत्यादी तालुक्यांतून तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातून शेतकरी चिंच विक्रीसाठी दरवर्षी येतात. चिंच खरेदीसाठी बारामती, पुणे, बार्शी, तुळजापूर, लातूर, औरंगाबाद, अलिबाग तसेच हैदराबाद या भागातून खरेदीदार येत असतात. शेतमालाचा लिलाव हा उघड लिलाव पद्धतीने होतो.

इलेक्ट्रॉनिक वजन
शेतमालाचे वजनमाप इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर लिलावापूर्वी होत असल्याने चिचेस चढ्या भावाने दर मिळत आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी चिंचेस जादा दर मिळत आहे तसेच आणखी दर वाढतील, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. यावेळी बारामती बाजार समितीचे सदस्य सतीश जगताप, अरुण सकट व सुपे व्यापारी अध्यक्ष सुभाष चांदगुडे व शेतकरी उपस्थित होते.

चिंचेचे बाजारभाव असे आहेत

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीतकमी दरजास्तीतजास्त दरसर्वसाधारणदर
04/03/2024
श्रीरामपूरक्विंटल150200040003000
नांदगावलोकलक्विंटल7170085018050
03/03/2024
श्रीरामपूरक्विंटल180150035002500
02/03/2024
बार्शीक्विंटल101083002000010000
श्रीरामपूरक्विंटल170150037002600
मुंबईलोकलक्विंटल24175001250010000
नांदगावलोकलक्विंटल3750083808350
01/03/2024
अहमदनगरक्विंटल14485001500011750
बार्शीनग63987001600011000
उदगीरक्विंटल5080001350010750
श्रीरामपूरक्विंटल190140040002700
कर्जत (अहमहदनगर)क्विंटल20200022002000
देवळालालक्विंटल3150522402160
अहमदनगरलोकलक्विंटल64260032802940
मुंबईलोकलक्विंटल14975001250010000
नांदगावलोकलक्विंटल4210083608250
दौंड-यवतलोकलक्विंटल4165020001850

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here