गेल्या जगभरातल्या कंपन्या एआय उत्पादन निर्मितीवर भर देत आहेत. चॅटजीपीटी आणि जेमिनीनंतर आता आणखी एक चॅटबॉट सुविधा सुरू झाली आहे. क्लॉड -3 असं या सुविधेचं नाव आहे. हा चॅटबॉट स्पर्धकांच्या तुलनेत अधिक चांगला असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
क्लॉड-3 चॅटबॉटची वैशिष्ट्यं जाणून घेऊ या. बार्ड आणि जेमिनीशी स्पर्धा करण्यासाठी आणखी एक चॅटबॉट सेवा सुरू झाली असून तिचं नाव क्लॉड-3 असं आहे.
क्लॉड -3 ही सेवा अमेरिकेतल्या अँथ्रोपिक पीबीसी नावाच्या एआय स्टार्टअप कंपनीनं लाँच केली आहे. कंपनीनं हे एक नवीन एआय जनरेटिव्ह टूल लाँच केलं असून ते लार्ज लँग्वेज मॉडेल्सवर आधारित आहे. क्लॉड -3 हे चॅटबॉट ओपन एआय आणि गुगलच्या जेमिनीच्या तुलनेत खूप चांगलं आहे, असा दावा कंपनीनं लाँचिंगवेळी केला आहे.
अँथ्रोपिक पीबीसी कंपनीनं याबाबत एक्सवर एक पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये कंपनीनं ओपस एआयविषयी माहिती दिली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेलं मॉडेल आहे.
कंपनीने तिचं मॉडेल क्लॉड-3 हायकूविषयी माहिती दिली. हे बुद्धिमत्तेच्या वर्गवारीत मार्केटमधलं सर्वांत परिणामकारक मॉडेल आहे. खूप मोठं आणि गुंतागुंतीचं काम करण्यासाठी त्याचा वेग सॉनेट क्लाउड 2 आणि क्लाउड 2.1 च्या तुलनेत दुप्पट आहे. ओपसचा वेग हा जुन्या मॉडेलइतकाच आहे.
कंपनीनं क्लॉड-3 हे चॅटबॉट वेगेवेगळ्या तीन आर्ट मॉडेलमध्ये लाँच केलं आहे. त्यात क्लॉड-3 ओपस, क्लॉड 3 सॉनेट आणि क्लॉड 3 हायकूचा समावेश आहे.
कंपनीनं आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून याबाबतचा डाटा शेअर केला आहे. डाटा शेअर करताना कंपनीनं लिहिलं आहे की, हे नेक्स्ट जनरेशनचं एआय मॉडेल आहे.
त्याने रीझनिंग, मॅथ्स, कोडिंग, मल्टीलिंग्वल अंडरस्टँडिंग आणि व्हिजनच्या बाबत एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे. क्लॉड 3 च्या तिन्ही एआय मॉडेल्सनी ओपन एआयच्या जीपीटी-4, जीपीटी-3.5सह जेमिनी 1.0 अल्ट्रा आणि जेमिनी 1.0 प्रो यांना आपापल्या श्रेणीत पिछाडीवर टाकल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं.