फेब्रुवारी महिना संपताच वातावरणात उष्णता जास्त जाणवू लागते. उन्हही वाढतं आणि वाराही गरम लागतो. या वातावरणात आरोग्याची योग्य काळजी घ्यावी लागते. असं केलं नाही तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात.
उन्हाळ्यात सगळ्यात महत्वाचं काम असतं शरीर हायड्रेट ठेवणं. वातावरणातील गरमी वाढल्याने पाणी अधिक पिणं गरजेचं असतं. चला जाणून घेऊ एका व्यक्तीने किती पाणी पिणं गरजेचं असतं.
लाइफ लाइन आहे पाणी
चांगला आहार आणि स्वच्छ हवेसोबतच शरीरासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. शुद्ध, स्वच्छ पाणी हे शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया योग्यपणे चालण्यासाठी गरजेचं असतं. पाण्याने केवळ आपली तहानच भागते असं नाही तर हे संपूर्ण शरीरासाठी महत्त्वाचं असतं. अशात हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे की, आपल्याला कधी आणि किती पाणी प्यायला हवे.
झोपेतून उठल्यावर
सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिणे चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. झोपेतून उठल्यावर एक ग्लास साधं पाणी किंवा कोमट पाणी प्यायल्याने आतड्यांना फायदा होतो. याने शरीराच विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते. तसेच रात्रभर पाण्याचं कमी झालेलं प्रमाणही याने नियंत्रित होतं.
जेवणाआधी किती?
जेवण करण्याआधी पाणी प्यायल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल. याचा अर्थ तुम्हाला जेवण कमी करण्याची शक्यता राहणार नाही. जेव्हा तुम्ही हायड्रेट असता तेव्हा पोटही जेवणासाठी तयार झालेलं असतं. पाणी चवीच्या पेशींना जागं करतो आणि पोटालाही मॉइश्चराइज करतो. एक ग्लास पाणी प्यायल्याने जेवताना तुम्हाला फार पाणी पिण्याची गरज पडणार नाही.
वर्कआउट करण्याआधी
तापमान आणि तुमच्या शरीरातील द्रव्य स्तराच्या आधारावर तुम्हाला वर्कआउट दरम्यान आणि नंतर डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी एक ग्लास पाणी पिण्याची गरज असते. याने तुमचा स्ट्रोकच्या समस्येपासूनही बचाव होऊ शकतो.
वर्कआउटनंतर
वर्कआउटनंतर तुम्हाला घाम आणि लघवीच्या माध्यमातून खर्ची केलेल्या तरल पदार्थांची गरज असते. त्यासाठी तुम्हाला पाणी पिणे गरजेचं असतं. तुम्ही कोणत्याही वातावरणात व्यायाम करा, पण पाणी आवर्जून प्यावं.
बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यावर
जर तुम्ही आजारी लोकांच्या संपर्कात असाल तर वायरस आणि बॅक्टेरिया दूर ठेवण्यासाठी तुम्हाला सामान्यापेक्षा थोडं जास्त पाणी प्यावं लागेल. याने शरीर बॅक्टेरिया मुक्त होईल. याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.
आजारी असताना
जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताप असतो, कफ किंवा सर्दीची समस्या असते तेव्हा शरीरात पाणी कमी होतं. याने तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. अनेक तज्ज्ञ सांगतात की, अशा स्थितीत जर भरपूर पाणी सेवन केलं तर आजार लवकर दूर पळतो.
थकवा येतो तेव्हा
थकवा हा डिहायड्रेशनच्या लक्षणांपैकी एक असल्याचं तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते तेव्हा थकवा जाणवतो. तुम्हाला ऑफिसमध्ये काम करताना थकवा जाणवत असेल तर एक ग्लास पाणी घ्या, तुमचा थकवा दूर होईल.