हॉटेल 7/12 येथे अवैध दारूच्या दिडशे बाटल्या पकडल्या

0
93
हॉटेल 7/12 येथे अवैध दारूच्या दिडशे बाटल्या पकडल्या

पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाने गंगापूर वैजापूर रोडवरील हॉटेल 7/12 येथे अवैध दारूच्या दिडशे बाटल्या पकडल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर हद्दीतील गंगापूर वैजापूर रोडवरील हॉटेल 7/12 येथे अभिषेक सुदाम म्हस्के वय 23 वर्ष रा तांदुळवाडी यांच्याकडे परवाना नसताना देशी दारूचे (१८० ml) चे १५० बाटल्या प्रत्येकी बाटली किंमत १०० रुपये प्रमाणे एकूण किंमत १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्या विरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया , अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोलीस हवालदार नवनाथ कोल्हे, रामेश्वर धापसे, गणेश सोनवणे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here