कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील
विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीला वाव मिळावा म्हणुन विद्यापीठातील पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाने याचे आयोजन केले आहे.
ही स्पर्धा मोबाईल फोटोग्राफी व डीएस्एल्आर कॅमेरा फोटोग्राफी आशा दोन विभागात घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे विषय क्लाउड फोटोग्राफी, पोर्ट्रेट फोटोग्राफी, स्ट्रीट फोटोग्राफी असे आहेत. स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण रोख रक्कम २० हजार रुपये सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तसेच सहभागी विदयार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
यासाठी स्पर्धकांनी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्पर्धक नाव नोंदणी करु शकतात. २७ ऑगस्ट पर्यंत पत्रकारिता आणि जनसंवाद विभागात हार्डकॉपी स्पर्धकांनी जमा करावी व सर्व विद्यार्थांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.या सर्व छायाचित्रांचे २८ ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
अधिक माहितीसाठी- ८८०५९९०४१८ / ९५५२१५२०८८या नं.संपर्क साधावा. या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे,अकॅडमीक डीन डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी, लिब्रल आर्टस् डीन डॉ. उत्तम जाधव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.