पोकळ वल्गना नको, कारखानदारांना पाठीशी घालू नका; कोल्हापुरात ‘स्वाभिमानी’ने मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

0
68

कोल्हापूर : गतवर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन १०० रूपयाचा हप्ता तातडीने द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना शुक्रवारी दुपारी वडगांव-हातकंणगले(जि.

कोल्हापूर) रोडवर काळे झेंडे दाखविण्यात आले.

राज्य सरकारने दोन महिन्यात ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर १०० रूपयाचा दुसरा हप्ता जमा करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी स्वत: मध्यस्थी करून पुणे बेंगलोर महामार्गावरील आंदोलन स्थगित केले होते.

जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांनी १०० रूपये देण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. मात्र राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेऊन मान्यता न दिल्याने कारखान्यांना दुसरा हप्ता देणे अडचणीचे झाले आहे.

जवळपास ३ महिने झाले तरीही शासनाने निर्णय न घेता सरकार कारखानदारांच्या पाठिशी राहिल्याने संतापलेल्या संघटनेच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनार्थ डिजीटल बोर्ड तयार केला होता.

या बोर्डवर १०० रूपयाचा दुसरा हप्ता बुडवून , एफ. आर पी चे तुकडे करून शेतक-यांच्या मुलांच्या हातात पेन नाही दगड घ्यायला लावणारे सरकार , मुख्यमंत्री महोदय पोकळ वल्गना करू नका ,कारखानदारांना पाठीशी घालू नका.ठरल्याप्रमाणे गत हंगामातील दुसरा हप्ता १०० रूपये तातडीने द्या अशा आशयाचे फलक दाखविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here