सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन-कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमेन, कोल्हापूर या महाविद्यालयामध्ये दि. ९ मार्च २०२४ रोजी एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे (मल्टिडिसिप्लिनरी अँड स्किल-बेसड एजुकेशन: चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटीज इन एनइपी २०२०) आयोजन करण्यात आले
होते. प्रा. (डॉ.) नितीन करमळकर, अध्यक्ष, सुकाणू समिती (नवीन शैक्षणिक धोरण २०२०), महाराष्ट्र सरकार आणि माजी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उद्दघाटन सोहळा संपन्न झाला.
त्यांनी भाषणात भारतीय ज्ञान परंपरा आणि नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयांची माहिती दिली. डॉ. देवकी गोखले यांनी आपल्या मुख्य भाषणात एनइपी २०२० अंतर्गत अन्न पोषण आणि आहारशास्त्र कौशल्य आधारित शिक्षण या विषयांची माहिती दिली.
प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणात नवीन शैक्षणिक धोरण २०२० मुळे विद्यार्थ्यांचा होणारा सर्वांगीण विकास याचे महत्त्व विषद केले. या कार्यक्रमासाठी १८० हुन अधिक संशोधक व विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदविलेला आहे.
एक ऑनलाईन व दोन ऑफलाईन ट्रॅक मध्ये संशोधक व विद्यार्थी यांनी त्यांचे शोधनिबंध सादर केले. सहा. प्रा. श्वेता पाटील, आयोजन सचिव यांनी राष्ट्रीय परिषदाच्या आयोजनाचे महत्व व त्याची उद्दीष्टे स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुनीता दलवाई आणि आभार प्रदर्शन डॉ निलम जिरगे यांनी केले. कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. व्ही. एम. हिलगे, विश्वस्त, सायबर ट्रस्ट यांची उदघाटन प्रसंगी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त डॉ. आर. ए. शिंदे आणि संस्थेचे सचिव सी. ए. एच. आर. शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.