आज स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुण-तरुणींचे पोलीस आणि प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचं स्वप्न आहे. पण हे स्वप्न त्या निवडक लोकांचच पूर्ण होतं, जे मोठ्या जिद्दीने स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात.
अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. जयप्रकाश अटल या पोलीस अधिकाऱ्याने आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. जयप्रकाश अटल यांते वडील रोजंदारी मजूर होते आणि आई गृहिणी होती.
10वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण गावातील सरकारी शाळेत झाले आणि ते टॉपर होते. जयप्रकाश सांगतात की, ते अभ्यासात खूप हुशार होते. अशा परिस्थितीत त्यांनी अकरावीत सायन्सची निवड केली होती. त्यांनी बारावीनंतर नर्सिंगसाठी अर्ज केला, पण फीसाठी पैसे नसल्यामुळे नर्सिंग करता आलं नाही.
बारावीनंतर घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पुढील शिक्षण काही वर्षे थांबलं होतं. परंतु त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूच ठेवली, त्यानंतर 2006 मध्ये त्यांची लॅब टेक्निशियन पदासाठी निवड झाली. त्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि नोकरीसह पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.
2011 मध्ये लग्न झालं आणि लग्नानंतर दोन मुलं झाली. पत्नी पुष्पा यांनी त्यांना खूप प्रेरणा दिली आणि 2013 मध्ये त्यांनी पहिल्यांदा आरएएसची परीक्षा दिली, पण यश मिळालं नाही. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी आरएएस परीक्षा दिली आणि एससी श्रेणीत 23 व्या रँकसह डीएसपी बनले. या पदावर पोहोचलेले ते गावातील पहिले तरुण होते. न्यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.