राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे येथील विवाहित महिलेचा सर्पदोष झाल्याने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की खिंडीवरवडे येथील विवाहित महिला सौ रेखा सुरेश खांडेकर ह्या आपल्या कुटुंबासहित शेता मधील रात्री उसाला लागण करण्यासाठी गेल्या होत्या अचानक पायाला टोचल्यासारखे झाले पण बॅटरी लावून पाहताच काय दिसण्यात आलं नाही त्यानंतर त्यांनी सौ रेखा हिला राधानगरी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले
परंतु प्राथमिक उपचार करून त्या विवाहित महिलेला कोल्हापूर सीपीआर हॉस्पिटलमध्ये पाठवून देण्यात आले उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने जाहीर केले, त्यांच्या पश्चात पती मुलगा मुलगी असा परिवार आहे