आज पार पडणार आहे. तब्बल 28 वर्षांनंतर भारताला मिस वर्ल्डचे आयोजन करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
हा फिनाले मुंबईतील सर्वात खास ठिकाणी पार पडलोय. या फिनालेकडे संपूर्ण जगाच्या नजरा या लागल्या आहेत. या फिनालेला फक्त देशच नाही तर विदेशातूनही लोक उपस्थित राहणार आहेत. 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा 20 फेब्रुवारीपासून सुरू झाली. ज्याचा फिनाले आज म्हणजे 9 मार्च 2024 रोजी मुंबईमध्ये पार पडतोय.
हा फिनाले आपल्याला आॅनलाईन पद्धतीने देखील बघता येईल. मिस वर्ल्डच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर याबद्दलची सविस्तर माहिती ही आपल्याला आरामात मिळेल. आता या फिनालेसाठी अवघे काही तासच शिल्लक आहेत. आज रात्री 7.30 ला हा फिनाले सुरू होणार आहे. ज्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतंय. हा एक ऐतिहासिक क्षण नक्कीच म्हणावा लागेल.
71 व्या मिस वर्ल्डचा ताज आज एकाला मिळणार आहे. हेच नाही तर या फिनालेचे थेट प्रक्षेपण देखील होणार आहे. मिस इंडिया 2022 ची विजेती सिनी शेट्टी ही भारताकडून प्रतिनिधित्व करताना दिसले. या फिनालेची शान वाढवण्यासाठी नेहा कक्कर आणि टोनी कक्कर हे देखील या मंचावर परफॉर्म करताना दिसणार आहेत.
हा सर्व फिनाले करण जोहर हा होस्ट करताना दिसले. या फिनालेची सर्वात विशेष बाब म्हणजे तब्बल 28 वर्षांनंतर हा फिनाले भारतामध्ये पार पडतोय. ही स्पर्धा तब्बल 27 वर्षांपूर्वी भारतातील बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा भारताला ही स्पर्धा आयोजित करण्याची मोठी संधी ही मिळाली आहे.
मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून या फिनालेची जय्यत तयारी सुरू होती. आता जवळपास तयारी सुरू असून या फिनालेकडे सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत. हेच नाही तर आता अवघ्या काही तासामध्ये विजेत्याची नावे ही जाहीर केली जातील. हा फिनाले जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडत आहे.