
उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेरून आल्यानंतर किंवा दुपारच्यावेळी घरात असतानाही काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा होते. (Cooking Hacks) अशावेळी घरात खास काही नसेल तर बाहेरून कोल्डड्रिंक आणण्याशिवाय काही पर्याय उरत नाही.
(How to Make Nimbu Sharbat) हे करण्यापेक्षा घरच्याघरी अगदी कमीत कमी वेळेत तुम्ही लिंबू सरबत बनवू शकतता. या युनिक पद्धतीचे इंस्टंट लिंबू सरबत बनवण्यासाठी तुम्हाला लिंबू चिरण्याची साखर वितळवण्याची झंझट करावी लागणार नाही. (Lemon Sharbat Premix Recipe)
इंस्टंट लिंबू सरबत कसे करायचे? (Instant Limbu Sharbat Recipe)
1) तुम्हालाही लिंबू सरबत पटकन बनवायचं असेल त्याआधी पूर्व तयारी करावी लागेल. लिंबू सरबताचे प्रिमिक्स बनवून घ्या. त्यासाठी ४ ते ५ मध्यम आकाराचे किंवा मोठे लिंबू हाताने किंवा चॉपिंग बोर्डवर चोळून घ्या. लिंबू चोळून घेतल्यानंतर मधोमध कापून लिंबातील बीया काढून घ्या. त्यानंतर लिंबाचा रस काढून एका ग्लासात भरून ठेवा.
2) लिंबाचा रस मोजून एका पसरट ताटात काढून घ्या. त्यात तिप्पट साखर घाला. १ कप लिंबाच्या रसासाठी ३ कप साखर घ्या. साखर व्यवस्थित पसरवून पंख्याखाली सुकवण्यासाठी ठेवा. सुकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने खाली वर करून घ्या. ३ दिवसांत हे मिश्रण पूर्णपणे सुकेल.
