कोल्हापूर जिल्हा मातंग समाज संघटनेच्या वतीने आदर्श पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन

0
157

कोल्हापूर -लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्याने आदर्श गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर जिल्हा मातंग समाज संघटना व मातंग कला ,क्रीडा,शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट याच्या संयुक्त विद्यामाने दसरा चौकातील शाहु स्मारक भवन येथे करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार दि 27 आँगस्ट रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे.

तसेच विविध क्षेत्रातील मान्यवराचा आदर्श गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सोबतच गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते राजीव आवळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्ड ,डेमोक्रॅटिक पार्टी आँफ इंडियाचे अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे,मातंग ट्रास्टचे अध्यक्ष शामराव शेंडगे,सचिव विलास मंगल,संदीप कवाळे,संजय वाघ,संजय दाभाडे,प्रा.रविंद्र पाटोळे,क्रांती सप्रे ,पत्रकार प्रदीप अवघडे (चिमगांवकर) उपस्थित राहाणार आहेत.

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील मातंग समाज बांधवानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here