वॉल्वो कार इंडियाने आज XC40 रिचार्जचे सिंगल मोटर व्हेरिएंट 54.95 लाख रुपये व कर या एक्स- शोरूम किंमतीत लाँच केले. XC40 चे बुकिंग ऑनलाइन करता येणार असून ते वॉल्वो कार इंडियाच्या संकेतस्थळावर करता येईल.
स्थानिक उत्पादनाप्रती बांधिलकी दर्शवत कंपनीने XC40 रिचार्ज सिंगल मोटरची जुळणी होसाकोते, बेंगळुरू, कर्नाटक येथे इतर वाहनांच्या श्रेणीसह केली आहे. कारचे प्री- बुकिंग आजपासून सुरू होत आहे. ग्राहकांना त्यांच्या जवळच्या वॉल्वो कार इंडिया बिझनेस पार्टनरकडे त्यांच्या कारचे प्री- बुकिंग करता येईल.
2022 मध्ये लाँच केल्यापासून XC40 रिचार्जला मिळालेल्या मोठ्या यशानंतर XC40 रिचार्ज हे त्याचे सिंगल मोटर व्हेरिएंट लाँच करताना आनंद होत आहे. या वाहनाची किंमत धोरणात्मक पद्धतीने निश्चित करण्यात आली असून त्यामागे ग्राहकवर्ग वाढवणे तसेच भारतीय ईव्ही बाजारपेठेच्या विकासाप्रती बांधिलकी जपण्याचा हेतू आहे.
हे लाँच भारतीय ग्राहकांना कामगिरी, शाश्वतता आणि सोयीस्करपणा पुरवण्याच्या आमच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असून त्याचबरोबर दरवर्षी भारतात एक नवे इलेक्ट्रिक मॉडेल उपलब्ध करून देण्याचे आमचे आश्वासनही त्यातून जपले जाईल. आमच्या इतर उत्पादनांप्रमाणेच XC40 रिचार्जची बेंगळुरू येथील होसाकोते प्लँटमध्ये बारकाईने जुळणी करण्यात आली आहे,’ असे वॉल्वो कार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा म्हणाले.
कामगिरी आणि रेंजच्या बाबतीत नवे मापदंड प्रस्थापित करणारी XC40 रिचार्ज सिंगल मोटर व्हेरिएंट ड्रायव्हिंगचा अनोखा आनंद देणारी आहे. डब्ल्यूएलटीपीनुसार 475 किलोमीटर्सची रेंज आणि आयसीएटी टेस्टिंग कंडिशन्सअंतर्गत 592 किलोमीटर्सची रेंज एका चार्जमध्ये मिळत असल्यामुळे ही ईव्ही चालकाला निर्धास्तपणे प्रवास करण्याचे स्वातंत्र्य देते. 238 एचपीचे पॉवर आउटपुट आणि 420एनएम टॉर्क यांसह XC40 रिचार्ज केवळ 7.3 सेकंदांत 0 ते 100 किमी/तास वेग घेते. कामगिरी आणि शाश्वतता असे दुहेरी हेतू यातून साधता येतात.
XC40 रिचार्ज सिंगल मोटर इलेक्ट्रिकविषयी
- ताकद – 238 एचपी
- टॉर्क – 420 एनएम
- बॅटरी – 69केडब्ल्यूएच
- बॅटरी टाइप – लि- आयन
- अॅक्सलरेशन – 0-100 – 7.3 सेकंद
- बॅटरी वॉरंटी – 8 वर्ष/160,000 किमी
- सर्वोच्च वेग: 180 किमी/तास
- डब्ल्यूएलटीपी रेंज – 475 किलोमीटर
- आयसीएटी रेंज – 592 किलोमीटर
- बॅटरीचे वजन – 500 किलो
- पुढील बाजूस दिलेले स्टोअरेज – 31 लीटर्स
- मागे दिलेले स्टोअरेज (बूट स्पेस) – 419 लीटर्स
- ग्राउंड क्लियरन्स (कर्ब वेट+ 1 व्यक्ती) – 175 एमएम
- एक पेडल ड्राइव्ह पर्याय
- लेदरमुक्त अंतर्गत सजावट
- बॅटरीच्या सुरक्षिततेसाठी अनोखी सोय
- अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम्स सेन्सर प्लॅटफॉर्मसाठी चांगल्या प्रकारे पॅकेज केलेले सेन्सर्स
- एलईडी हेडलाइट मिड
- डिजिटल सेवा 5 वर्षांच्या सबस्क्रिप्शनसह
- गुगल बिल्ट- इन (गुगल असिस्टंट, गुगल प्ले, गुगल मॅप्स)
- वॉल्वो कार्स अॅप (कार लॉक/अनलॉक, प्रीकंडिशनिंग, बॅटरी चार्जिंग स्टेटस)
- हाय परफॉर्मिंग साउंड सिस्टीम (250डब्ल्यू, 8 स्पीकर्स)
- वॉल्वो ऑन कॉल
- PM 2.5 सेन्सरसह प्रगत एअर प्युरिफायर सिस्टम
- रिवर्जिंग कॅमेरा
- क्रॉस ट्रॅफिक अलर्टसह ब्लाइंड स्पॉट इन्फर्मेशन सिस्टीम
- अडॅप्टिव्ह क्रुझ कंट्रोल
- पायलट असिस्ट
- लेन किपिंग एड
- कोलायजन मिटिगेशन सपोर्ट (पुढे आणि मागे)
- 7 एयरबॅग्ज
- स्मार्टफोनसाठी वायरलेस चार्जिंग
सोयीस्कर ओनरशीप पॅकेज
- प्रारंभिक एक्सशोरूम किंमत – 54.95 लाख रुपये अधिक कर, पुढील बाबींचा समावेश
- 8 वर्षांची बॅटरीची वॉरंटी
- 3 वर्षांची सर्वसमावेशक कार वॉरंटी
- 3 वर्षांचे वॉल्वो सर्व्हिस पॅकेज
- 3 वर्षांचे रोड साइड असिस्टन्स
- 5 वर्षांचे सबस्क्रिप्शन डिजिटल सेवांसाठी
- 1 वॉल बॉक्स चार्जर (11 डब्ल्यू) थर्ड पार्टीच्या माध्यमातून
वर्ष 2023 मध्ये वॉल्वोची संपूर्ण इलेक्ट्रिक मॉडेल्स, XC40 रिचार्ज आणि C40 रिचार्ज यांचा एकूण विक्रीतील हिस्सा 28 टक्के होता. विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवर जुळणी करण्यात आलेली पूर्णपणे इलेक्ट्रिक XC40 रिचार्ज ड्युएल मोटरने लक्षणीय कामगिरी केली असून या काळात 510 युनिट्सची विक्री झाली आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबर 2023 मध्ये लाँच झालेल्या C40 रिचार्जने लक्ष वेधून घेत अल्पावधीतच 180 युनिट्सची विक्री नोंदवली.
त्रे – क्रोनॉर – आलिशानतेचा असामान्य अनुभव
XC40 रिचार्ज आणि C40 रिचार्जच्या ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेला ‘त्रे- क्रोनॉर एक्सपिरीयन्स’ हा प्रोग्रॅम XC40 रिचार्ज सिंगल मोटरच्या ग्राहकांनाही मिळणार आहे. त्रे- क्रोनॉरमध्ये स्वीडिश लक्झरीच्या तीन प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे ग्राहकांना आलिशानता तसेच खास वैयक्तिक सुविधांचा अनुभव घेता येणार आहे.