राधानगरी /प्रतिनिधी, विजय बकरे
लोकशाहीतील प्रत्येक निर्णय हा लोकहिताचा आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी असतो. प्रशासकीय कामात समाजातील तज्ञ, समाजसेवक, विविध घटकातील प्रतिनीधी इ. चा समावेश करण्यात येतो.
असा समावेश करून विविध समित्या स्थापन करून सदस्यांची निवड करण्यात यावी. या माध्यमातून तालुकास्तरीय विचार केला तर पुढील समित्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या समित्यातून तालुकास्तरीय स्तराचे बहुतांशी प्रश्न सोडविण्यात मदत होईल, असे मनसे जनाधिकार सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज येडूरे म्हणाले.
यावेळी तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समिती, तालुका समन्वय समिती, तालुका शांतता समिती, तालुका दारूबंदी समिती, तालुका रोजगार हमी योजना समिती, तालुका दक्षता समिती, तालुका व्यवसनमुक्ती समिती, तालुका तंटामुक्ती समिती, तालुका क्रिडा संकुल समिती, तालुका संजय गांधी योजना समिती, तालुका नैसर्गिक आपत्ती समिती, तालुका जलयुक्त शिवार अभियान आढावा व समन्वय समिती, तालुका वेठबिगार निर्मुलन दक्षता समिती, तालुका दुष्काळ निवारण समिती, आदी समितीचा समावेश आहे
यावेळी गडहिंग्लज, कागल, चंदगड, आजरा तहसीलदार गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले, यावेळी मनसे जनाधिकारी सेनेचे जिल्हा संघटक ऋषभ आमते, दीपक जरग, अमित कोरे, रणजीत पाटील, संदीप बोते, सौरभ कांबळे आदी उपस्थित होते