ईशा अंबानींच्या होळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींच्या जलवा, प्रियांका पासून शिल्पा पर्यंत. पाहा व्हिडीओ

0
188
ईशा अंबानींच्या होळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींच्या जलवा, प्रियांका पासून शिल्पा पर्यंत. पाहा व्हिडीओ

: रंगांचा सण म्हणजे होळी जवळ येत आहे. सर्वसामान्यांसोबतच स्टार्सही हा सण साजरा करण्यासाठी उत्सुक असतात. झगमगत्या विश्वात तर होळीची लगबग सुरु देखील झाली आहे. होळी सण साजरा करण्यासाठीसेलिब्रिटी हाय प्रोफाईल पार्टीचंआयोजन करण्यात येतं.

पार्टीसाठी अनेक सेलिब्रिटी एकाच ठिकाणी जमा होतात आणि पार्टीचा आनंद लुटतात आणि होळी पर्ट्यांची सुरुवात झाली आहे. नुकताच, प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने होळी पार्टीचं आयोजन केलं.

ईशा अंबानी यांनी आयोजित केलेल्या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. परदेशातून आलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने देखील पार्टीमध्ये उपस्थिती दर्शवली होती. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

ईशा अंबानी यांच्या अर्बन पार्टीमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, ऑरी, अथिया शेट्टी, माधुरी दीक्षित यांसारख्या अनेक सेलिब्रिटी देखील आले होते. पार्टीत उपस्थित राहण्यासाठी सेलिब्रिटींनी केलेला खास लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

झगमगत्या विश्वात ईशा अंबानी यांनी यंदाच्या वर्षी होळी पार्टीची सुरुवात केली आहे. आता कोणते सेलिब्रिटी होळी पार्टीचं आयोजर करतील याकडे सर्वांच लक्ष लागलं. झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी एकत्र प्रत्येक सणाचा आनंद घेत असतात. दिवाळी, होळी, गणपती अनेक सण बॉलिवूडमध्ये मोठ्या थाटात साजरे केले जातात. आता सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा अंबानी यांच्या होळी पार्टीची चर्चा रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here