डवरी समाजाच्या विकासासाठी धोरण आणि कृती आराखडा तयार : अध्यक्ष शिवराम डवरी

0
15

डवरी समाजाच्या विकासासाठी धोरण आणि कृती आराखडा तयार : अध्यक्ष शिवराम डवरी

प्रतिनिधी रोहित डवरी: SP-9 न्यूज

नाथपंथी डवरी समाजाची सहविचार सभा कोल्हापूर येथे संपन्न झाले. पाचगाव येथे आयोजित नाथपती डवरी समाज सहविचार सभा यावेळी अध्यक्ष शिवराम डवरी आणि कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन श्री राजन डवरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहविचार सभा पार पडली. डवरी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी विचार विनिमय करण्यात आले. यावेळी उद्योग क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुण-तरुणींच्यासाठी नाथ बाजार ही संकल्पना मांडण्यात आली त्यावेळी नाथ बाजाराची संपूर्ण जबाबदारी सचिन जाधव यांनी घेतली. समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो आणि समाजाच्या विकासासाठी समाजातील तरुणांच्या भविष्यासाठी नाथपंथी डवरी समाज सेवाभावी संस्थेसाठी श्री राजन डवरी कार्यकारी अभियंता यांनी समाजाचे विकासासाठी १ लाख ११हजार १११ रुपये इतकी देणगी जाहीर करण्यात आली त्याचवेळी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक विजय डवरी ठाणे यांनी त्यांच्या वतीने १ लाखाची भरघोस असा निधी जाहीर केला.

नाथपंथी डवरी समाजाचे अध्यक्ष माजी गटशिक्षणाधिकारी शिवराम डवरी यांनी ५१ हजार रुपये देणगी जाहीर केली. अशा अनेक समाजातील नातं बांधवांनी आपापल्या परिस्थितीनुसार समाजासाठी स्वेच्छेने देणग्या जाहीर करण्यात आल्या. तसेच समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या दहा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री महेश जाधव यांनी विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतली. या सभेच्या वेळी समाजाच्या विकासासाठी अनेक ध्येयधोरण याच्यावर चर्चा करण्यात आली.

यावेळी समाजाची जनगणना ,समाज सक्षमीकरण आणि विकास, भविष्यातील समाजाच्या वाटचाली, समाजाची आव्हाने, समाजासाठी कृती योजना आणि सुविधा, महिला सक्षमीकरण, समाजाची संस्कृती आणि चालीरीती, व्यसनमुक्ती आणि अनिष्ट प्रथा बंदी यावर सुद्धा सखोल चर्चा करण्यात आली. या सभेच्या वेळी आबालविरुद्ध तरुण-तरुणी विद्यार्थी अशा सर्व घटकांच्यावर विचार विनिमय करून ही सभा पार पाडण्यात आली. सभेचे नियोजन संजय डवरी यांच्या नेतृत्वाकडे करण्यात आले. यावेळी समाजातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष नाथपंथी डवरी समाजाचे अध्यक्ष शिवराम डवरी हे होते. समाजासाठी अनेक नात बांधवांचे मनोगत व्यक्त झाले. उपाध्यक्ष सुनील यादव यांनी सुद्धा आपले मत मांडले. यावेळी राज्य सदस्य कोंडीबा डवरी, मुरलीधर जगताप ,कृष्णा डवरी, बाळ डवरी बोरवडेकर, अनिल डवरी मरळीकर, सचिन जाधव, महेश जाधव ,सुभाष डवरी ,निलेश डवरी ,रामचंद्र डवरी, रोहित डवरी आणि सर्व नाथ बांधव उपस्थित होते. सर्व उपस्थित नातं बांधवांचे सत्कार आणि सन्मान करण्यात आला.यावेळी प्रकाश डवरी गंगापूर यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here