ऑरीचा राधिका अंबानीसोबत गरबा

0
161
Orry : ऑरीचा राधिका अंबानीसोबत गरबा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं प्री-वेडिंग विविध कारणाने अजूनही चर्चेत आहे. या कार्यक्रमात ऑरीनेदेखील (Orry) हजेरी लावली होती. अनंत आणि राधिकाचं प्री-वेडिंग फंक्शन संपून बरेच दिवस उलटले असले तरी ऑरी अजूनही सेलिब्रेशनमध्ये मग्न दिसत आहे.

म्हणूनच ऑरी या फंक्शनचे न पाहिलेले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत आहे. आता अलीकडेच ऑरीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऑरी राधिका मर्चंटसोबत गरबा डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये ऑरी आणि राधिका मोठ्या उत्साहात गरबा करताना दिसत आहेत. यावेळी, राधिका सोनेरी रंगाच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे, तर ओरीने त्याच्या नेहमीच्या शैलीत बहु-रंगीत ब्लेझर आणि पँट घातलेला दिसत आहे.

यावेळी चाहते राधिकाच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहेत, राधिका-ऑरीचा डान्स पाहून चाहत्यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील जेठालालची आठवण आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here