प्रतिनिधी : प्रियांका शिर्के-पाटील

कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात काहीही होऊ द्या, पण भाजपचा उमेदवार विजयी होता कामा नये, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन्ही ठिकाणी आपल्याच पक्षाचा उमेदवार असावा अशी सर्वच नेते पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर बैठकीत इच्छा व्यक्त केली. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील स्थितीचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांकडून घेतला. दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिंदे गटात गेले असले, तरी मतदार हा ठाकरेंसोबत आहे, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
