सांगलीत कृष्णेचं पात्र कोरडंठाक; भीषण पाणी टंचाई उद्भवणार, कोयना जलाशयातून विसर्गाची गरज भासणार

0
212

कागल प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

सांगलीजवळ कृष्णा नदीचे पात्र पुन्हा कोरडं पडू लागलं आहे.ऑगस्ट महिन्यामध्येच कृष्णा नदीचं हे असं कोरडं पात्र सांगलीकर बऱ्याच वर्षांनी पाहत आहेत.सध्या आयर्विन पुलाच्या खालचे कृष्णा नदीचं कोरडं पात्र दिसू लागलं आहे.

सध्यातरी नदीनं काही ठिकाणी तळ गाठला असला तरी सांगली, कुपवाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलजवळ आठवडाभर पाणी उपसा होईल, इतका पाणीसाठा आहे.

आठवड्याभरात मात्र पावसानं दमदार हजेरी लावली नाही, तर कृष्णा नदीत कोयना जलाशयातून विसर्ग करण्याची गरज लागू शकते.जर पावसानं अशीच ओढ घेतली तर मात्र पाणी टंचाई आणखी वाढू शकते.

येत्या महिन्यात गणपतीचे आगमन-विसर्जन होणार असल्यानं मोठा पाऊस पडला नाही, तर गणपती विसर्जनाचाही प्रश्न उभा राहणार आहे.गणपती विसर्जनासाठी महापालिका प्रशासनानं पाटबंधारे विभागाला कोयना धरणातून नदीत पाणी सोडण्याबाबत विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here