गौरीताईंच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या विविध कार्यक्रमात महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद…

0
82

पुणे /प्रतिनिधी :माजी सरपंच गौरीताई चित्तरंजन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यामध्ये उद्योजिका महिलांना आपल्या व्यवसाय स्टॉलच्या माध्यमातून अधिक महिलांपर्यत पोहोचवण्यासाठी भव्य स्टॉल प्रदर्शन तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धा, मेकअप हेअर स्टाईल स्पर्धा,उखाणे स्पर्धा,महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा अश्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

मोठ्या प्रमाणात महिलांनी सर्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला तसेच सायंकाळी महिलांसाठी खास मंगळागौरी ग्रुप कार्यक्रम स्पर्धा घेण्यात आली,आपली पारंपरिक संस्कृती जपत महिलांनी अतिशय सुंदर नृत्य केले तसेच या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या या सर्व स्पर्धांना परीक्षक म्हणून डॉ.उज्ज्वला काळभोर ,प्रा.भाग्यश्री भिकोले,प्रियांका ढम Tiny heart पूर्व school,मनीषा राऊत (मणिकर्णीका अध्यक्ष ) लाभल्या होत्या.

तसेच उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांमधून लकी ड्रॉ च्या माध्यमातून पहिल्या 85 महिलांना विशेष भेटवस्तू देण्यात आल्या तसेच उपस्थित सर्व महिलांना गिफ्ट कुपन देण्यात आले या कार्यक्रमात दिवसभरात अनेक मान्यवर उपस्थित होते,.

यामध्ये पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर,कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड, उपसरपंच नासिर पठाण,मा.पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर,मा.सरपंच माधुरी काळभोर,लोणी काळभोर च्या उपसरपंच ललिता काळभोर, मा.उपसरपंच ज्योती काळभोर, मा.सरपंच वंदना काळभोर, मा.उपसरपंच भारती काळभोर,मा.सरपंच पुनम चौधरी, मा.उपसरपंच संगीता काळभोर, साधना बँकेच्या संचालक वंदना काळभोर,साधना बँकेच्या संचालक रोहिणी तुपे,सोनाली काळभोर,पोलीस इन्स्पेक्टर शीतल काळभोर,स्मिता घुले,सविता वर्मा,सुपर्णा हरपळे ,उज्ज्वला हरपळे,यशवंत साखर कारखान्याच्या संचालिका कमल नानी काळभोर, श्वेता काळभोर, अनुराधा नखाते,वैजंता कदम, सविता साळुंखे,राणीताई बडदे, माधुरी काळभोर,वृषाली गायकवाड, माधुरी गायकवाड, रुक्मिणी चांदणे, वसुधा केमकर, नूतन कोतवाल, मा.पंचायत समिती सदस्या रत्नमाला भोसले, सारिका भोंडवे,वैशाली बाबर,निर्मला अडसूळ,वैशाली हरपळे, मोना कामठे, कोमल काळभोर, प्रीती काळभोर, विद्या हांडे, तसेच ग्रामपंचायत सदस्या-सुनंदा काळभोर,
राजश्री काळभोर,बिना काळभोर, सिमिता लोंढे,कोमल काळभोर, मंदाकिनी नामुगडे,सोनाबाई शिंदे,सलीमा पठाण,राणी गायकवाड,रुपाली काळभोर,

ग्रामपंचायत सदस्य – आकाश काळभोर, दीपक आढाळे, अविनाश बडदे,स्वप्नेश कदम, योगेश मिसाळ, तसेच मा.उपसरपंच अशोक कदम,मा.ग्रा.सदस्य प्रितम गायकवाड, गुरुदेव जाधव, राजेंद्र काळभोर,मुकुंद काळभोर, उदय काळभोर, सुहास काळभोर, तुषार काळभोर, मयूर काळभोर, विकास कदम, जयसिंग घाडगे, दीपक काळभोर, अनिल गायकवाड,अशोक शिंदे,प्रताप कदम,जयप्रकाश कदम,सतिश काळभोर, ज्ञानेश्वर नामुगडे,तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित बडदे,राकेश लोंढे,शब्बीर पठाण, शिवाजी कदम,मधुकर कदम,ह.भ.प.सूर्यनारायण काळभोर, रमेश कोतवाल,बाप्पू गायकवाड, अशोक तात्या गायकवाड, शिवा नाना काळभोर,अमित काळभोर, सचिन काळभोर, महेश काळभोर,अमोल काळभोर,सिद्धेश कायगुडे, प्रसाद कदम,शेखर काळभोर,शरद जाधव,कुलदीप आटोळे, समीर शेंडगे इत्यादींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here