पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम २० ते २२ जुलै २०२४

0
88

प्रतिनिधी मेघा पाटील

पावनखिंड रणसंग्रामाला उजाळा मिळण्यासाठी शिवराष्ट्र परीवार – महाराष्ट्रतर्फे ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ या देशव्यापी ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या मोहिमेचे ३१ वे वर्ष असून यामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, नरवीर रायाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल, सरसेनापती कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजीत जेथे, तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे, सरदार पिलाजी सनस यांचे वंशज बाळासाहेब सनस यांचा मोहिमेत विशेष सहभाग असणार आहे.
शनिवारी, २० जुलै २०२४ रोजी पन्हाळगड येथे सकाळी ७:३० वाजता मान्यवरांच्या हस्ते वीरांचे पूजन होऊन मोहिमेस सुरुवात होईल. २२ जुलै रोजी पावनखिंडमध्ये सकाळी १० वाजता मोहिमेचा समारोप होईल.
शनिवारी (दि. २०) रोजी खोतवाडी येथे पावनखिंड रणसंग्राम हा माहितीपट मोठ्या पडद्यावर दाखविला जाईल, त्यानंतर इतिहास व्याख्याते दिपकराव करपे यांचे व्याख्यान होईल. सोमवारी (दि. २२) इतिहास अभ्यासक भुपाल शेळके यांचे पावनखिंडीत व्याख्यान होईल.

मोहिमेचे प्रवेश शुल्क १०५० रुपये असून यामध्ये पाच जेवण, तीन नाष्टा, पाच चहा, मुक्काम, पावनखिंड माहितीपटचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी मोहीम प्रमुख विनायक जरांडे (मो. 8600226382) किंवा गणेश कदम (मो. 7875590474) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रवेश अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/6KH15HQuwaxqNbGT8

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here