महावीर एन.सी.सी. व निगवे दुमाला ग्रामपंचायत यांच्या वतीने ३०० रोपांच वृक्षारोपण संपन्न

0
587

प्रतिनिधी: मेघा पाटील


कोल्हापूर : येथील महावीर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभाग व ग्रामपंचायत निगवे दुमाला यांच्या वतीने निगवे या ठिकाणी ३०० रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. केंद्र सरकारच्या एक पेढ मां के नाम या उपक्रमाअंतर्गत या वृक्षारोपनाचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या काळात पर्यावरणाचा ढासळता समतोल, अनियोजित पर्जन्य, प्रदूषण या अनेक समस्यांवर वृक्षारोपण हा अत्यंत उपयुक्त उपाय आहे

यासाठी युवक व समाजात पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी.या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी वढ,निलगिरी, कडुनिंब,चिंच, अश्या ३०० रोपांचे लागण करण्यात आले.


कर्नल एम. मुठांना, प्राचार्य डॉ राजेंद्र लोखंडे याच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन उमेश वांगदरे, लेफ्टनंट डॉ सुजाता पाटील, ग्रामविकास अधिकारी संजय शिंदे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.

तसेच सरपंच रुपाली पाटील,उप सरपंच संकेत बाडकर, सदस्य दिपाली चौगुले,गिरीश पाटील,सूरज एकशिंगे,धनाजी पाटील, बत्तास चौगुले, सुबेदार मेजर शिवा बालक, जी व्ही रमंना यांच्या सह ८० एन.सी.सी. छात्र या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here