कोल्हापूर प्रतिनिधी : मेघा पाटील
कोल्हापूर: इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज् तर्फे काल डॉक्टर्स आणि सीए दिनानिमित्त शाहू स्मारक भवनात झालेल्या कल्चरल इव्हेंट मध्ये गाणी आणि डान्स स्पर्धा घेतल्या गेल्या. या स्पर्धा फक्त डॉक्टर्स आणि सीए यांच्यासाठी होत्या.
कार्यक्रमात दीप प्रज्वलन बाई ग या नवीन मराठी चित्रपटा च्या कलाकार सुकन्या कुलकर्णी मोने, नम्रता गायकवाड, दिग्दर्शक पांडुरंग जाधव, निर्माते डॉक्टर आशिष अग्रवाल, लेखक विपुल पाटील, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर आणि क्लब प्रेसिडेंट स्मिता सावंत, सेक्रेटरी नंदिनी पाटील, ट्रेझर र वृषाली बाड, आय एस ओ दिव्या घाडगे, एडिटर पूनम सरनाईक यांच्या हस्ते झाले. व प्रास्ताविक प्रेसिडेंट स्मिता सावंत यांनी करून कार्यक्रमाला सुरुवात झाली
कलाकारांना त्यांच्या कलागुणांसाठी एक प्लॅटफॉर्म मिळवून देणे आणि त्यातूनच fund उभा करून जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचणे… हाच कार्यक्रम पाठीमागील उद्देश होता.
आपल्या डॉक्टर आणि सीए मंडळीं च्या अप्रतिम सादरीकरणामुळे कार्यक्रम उंचीवर जाऊन पोहोचला.
कार्यक्रमाचे बक्षीस वितरण इनरव्हील क्लब past district chairman डॉक्टर विद्युत शहा आणि कार्यक्रमाचे जज बिडकर सर, दिनेश सर आणि सरदार पाटील
यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपनेते जिल्हा प्रमुख संजय पोवार उपस्थित होते. सर्व क्लब मेंबर आणि क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सेक्रेटरी नंदिनी पाटील यांनी मानले.