तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही; बच्चू कडू यांची मोठी घोषणा

0
62

*प्रतिनिधी -प्रदिप अवघडे

,चिमगाव शेतकरी आणि दिव्यांगांसबंधी आपल्या काही मागण्या आहेत, त्या जर सरकारने पूर्ण केल्या तर मी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतो असं वक्तव्य प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी केलं. आपण महायुतीत नसून वेळ पडली तर शेतकरी , मजूर आणि कष्टकऱ्यांची आघाडी करून आपण निवडणूक लढवू असंही ते म्हणाले. 19 तारखेला राज्य सरकारला आमच्या मागण्याचे निवेदन देणार असल्याचं ते म्हणाले.आगामी निवडणूक महायुतीतून लढवणार का असा प्रश्न विचारल्यानंतर आमदार बच्चू कडू म्हणाले की, कोण म्हणतंय मी महायुतीमध्ये आहे? आपण महायुतीमध्ये नाही. वेळ पडली तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू.. शेतकरी आणि दिव्यांगांच्या संबंधित मागण्यासंदर्भात बच्चू कडू हे राज्य सरकारला 19 जुलै रोजी निवेदन देणार आहेत. त्यामधील मागण्या जर सरकारने मान्य केल्या तर आपण निवडणूक लढवणार नाही असं बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे. मी जागा सोडल्यावर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यायची त्यांनी द्यावी असंही ते म्हणाले. *काय आहेत बच्चू कडूंच्या मागण्या?* पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोजगार हमीमधून करावी. 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांना भाव द्यावा. दिव्यांगाना 6 हजार रुपये प्रति महिना द्यावा. गरीब आणि श्रीमंतांमधील विषमता वाढत चालली आहे. त्यात समता आणावी. शेतमजू आणि कलेक्टरचा मुलगा एकाच शाळेत शिकावा अशी समता सरकारने आणावी. तिसऱ्या आघाडीचे संकेतआमदार बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत. आपण महायुतीत नसून शेतकरी, मजुर, दलित, आदिवासी, वंचितांना घेऊन आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवू असं बच्चू कडू म्हणाले. आमचीही तिसरी आघाडी नसून पहिली आघाडी असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here