पैशाची गडबड करून महायुतीत गेलात, मला पुरोगामी विचार शिकवता काय? संभाजीराजे हसन मुश्रीफांवर भडकले.

0
98

प्रतिनिधी अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : पैशाची गडबड करून महायुतीची वाट धरणाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामित्व मला शिकवायची गरज नाही. माझ जन्म त्यांच्या घराण्यात झाला आहे, असा हल्लाबोल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे. रविवारी विशाळगडावर अतिक्रमणमुक्त मोहीम राबवण्यात आली. यावेळी झालेल्या हिंसाचारावर बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विशाळगड अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना संभाजीराजेंनी अशी भूमिका का घेतली? असा सवाल उपस्थित केला होता. त्याला संभाजीराजेंनी प्रत्युत्तर दिले. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here