* प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यावरुन सुरू झालेला वाद चांगलाच चिघळला असल्याचे दिसत आहे. रविवार दि १४ जुलै झालेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर आज १६ जुलै रोजी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार बंटी पाटील हे विशाळगडावरील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले आहेत. मात्र पोलिसांनी शाहू महाराज छत्रपती, बंटी पाटील यांच्यासह सर्व नेत्यांना विशाळगडावर जाण्यास रोखल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. यानंतर परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दोन दिवसांपूर्वी विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेच्या वेळी अज्ञातांनी गोंधळ घालत विशाळगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गजापूर गावात धुडगुस घातला होता. जमावाने अनेक घरांची मोडतोड करत घर पेटवून देण्याचा प्रयत्नही केला आहे. या पार्श्वभूमीवर आज १६ जुलै रोजी कांग्रेस चे जिल्ह्यातले नेते विशाळगडाच्या पायथ्याला जात आहेत.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हि बी पाटील यांच्यासह अनेक नेते यामध्ये सहभागी आहेत. विशाळगडाच्या पायथ्याला ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झालं आहे अशा नागरिकांची भेट घेऊन त्यांना मदत पोहोचवण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते या परिसरात जात आहेत. मात्र पोलिसांनी या सर्व नेत्यांना गडावर जाण्यापासून रोखले आहे. ज्यामुळे पांढरे पाणी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दरम्यान, विशाळगडावर जाण्यावर खासदार शाहू महाराज यांच्यासह बंटी पाटील ठाम आहेत. पोलिसांनी निदान १५ जणांना गडावर जाण्यास परवानगी द्यावी. जर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला थांबवलं तर नाईलाजस्थाव आम्हाला त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करावं लागेल असा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिलेला आहे.
Home Uncategorized विशाळगडावर जाण्यास प्रतिबंध शाहू महाराज छत्रपती, सतेज पाटील यांना पोलिसांनी रोखलं; परिसरात...