विशाळगड अतिक्रमण प्रकरणी आज हायकोर्टात तातडीची सुनावणी; अंतिम सुनावणीपर्यंत बांधकामांना संरक्षण देण्याची याचिकाकर्त्याची मागणी

0
68

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर :विशाळगडावरील अतिक्रमण प्रकरणी आज १९ जुलै रोजी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गडावरील बांधकामांना संरक्षण देण्याबाबत कोर्टात याचिका दाखल करण्यात आले. अंतिम सुनावणीपर्यंत बांधकामांना संरक्षण देण्याची मागणी आहे. हायकोर्टाच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलेले आहे.विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने हाती घेतलेली मोहीम तसेच विशाळगड अतिक्रमणांपासून वाचवण्यासाठी उजव्या विचारसणीच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनेचे प्रकरण गुरुवारी हायकोर्टात पोहोचले. त्यावेळी, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला विशाळगडावरील बांधकामे पाडण्यापासून प्रतिबंध करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन प्रकरणावर आज तातडीची सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला याच्या खंडपीठासमोर ही याचिका गुरुवारी सादर करण्यात आली. याचिकेत विशाळगडावरील बांधकामांना याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here