प्रतिनिधी अभिनंदन पुरीबुवा
मुंबई:सोशल मीडिया ला आयुष्य समजणाऱ्या रिल्स स्टार आणि यु ट्यूबर ने हे समजून घेतलं पाहिजे की तुमचं आयुष्य तुमच्या सोशल मीडिया च्या कंटेन्ट पेक्षा खूप अनमोल आहे ते थोड्या प्रसिद्धी साठी वाया घालवू नका..मुंबई मधील रिल्स स्टार इनफ्लून्सर तरुणी अन्वी कामदार उंच टेकडीवरून सेल्फी घेण्याच्या नादात पाय घसरून तीनशे फूट खोल दरीत पडली आणि तिचा मृत्यू झाला..सगळ्या यु ट्यूबर ब्लॉगर आणि रिल्स स्टार ने हे समजून घेतलं पाहिजे की तुम्ही असे व्हीडिओ वगैरे बनवताना फक्त स्वतःचाच जीव धोक्यात घालतं नाहीत तर असंख्य लोकांना तिथे येऊन आपले आयुष्य दावणीवर लावायला तुमच्या रिल्स च्या माध्यमातून प्रवृत्त करत असता..सगळ्या अश्या धोकादायक स्पॉट वर पावसाळी दिवसात बंदी घालायला हवी आणि तिथं रिल्स वगैरे शूट करायला देखील परवानगी देऊ नये.