आर्मीतून सुट्टीवर घरी आलेल्या पतीला पत्नीने हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजलं; कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील धक्कादायक घटना उघडकीस

0
228

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर :कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नूल या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुट्टीवर घरी आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाचे हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजल्याची घटना उघडकीस आली आहे. या जवानाला ठार मारण्याच्या प्रयत्नाबद्दल पत्नीसह अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमर भिमगोंडा देसाई, असे या ३९ वर्षीय जवानाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे नूल ता गडहिंग्लज गावचे असलेले अमर हे पत्नीसह गडहिंग्लजला संकेश्वर रोडवरील पाटणे पाईप कारखान्याजवळ भाड्याच्या घरात राहतात. अमर ड्युटीवर गेल्यानंतर पत्नी एकटीच घरी असते. दरम्यान, काही दिवसापूर्वीच अमर सुट्टीवर आले आहेत. गुरूवार दि १८ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरातच पत्नी व तिच्या अज्ञात साथीदाराने अमरचे हात-पाय, डोळे बांधून त्याला नाकावाटे व तोंडावाटे कोणते तरी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते.त्यावेळी अमर हख जोरात ओरडल्याने शेजारचे नागरिक त्यांच्या घरी आले. दरवाजा तोडून नागरिकांनी आत प्रवेश केला. त्यावेळी अज्ञात साथीदाराने खाडे नावच्या नागरिकाच्या डोक्यात कशाने तरी मारून तेथून पळ काढला. त्यानंतर नागरिकांनी खाडे व अमर यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.येथे प्राथमिक उपचारानंतर अमर यांना कोल्हापुरच्या सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अमर याच्या फिर्यादीवरून पोलिसात पत्नी व अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here