कोल्हापूर :विशाळगडावरील निवासी बांधकामावर भर पावसात हातोडा का? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सज्जड दम

0
119

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

मुंबई : विशाळगड परिसरातील एक ही बांधकाम हटविण्यात आले तर हायकोर्ट त्या प्रशासनाची चांगलीच शाळा घेतली घेईल, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दम भरला. भर पावसात विशाळगडावरील बांधकामावर हातोडा का चालवला? असा सवालही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील विशाळगडावर सुरु असलेल्या बेकायदेशीर बांधकाम हटविण्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्काळ स्थगिती देण्यात आली.विशाळगडाजवळील हिंसाचार आणि त्यानंतर प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या विरोधात याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने दाद मागितली होती. त्याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने राज्य सरकारला खडा सवाल केला, की पावसाळ्याचे दिवस सुरु असताना बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करु नये, तिथे राहणाऱ्यांचं छत असतं, असे स्पष्ट आदेश असतानाही ही कारवाई का केली गेली?न्यायलयात सादर केलेल्या व्हिडिओत पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. असं सांगत शाहूवाडी पोलीस स्थानकाच्या मुख्य अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीला जातीने उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आजच्या घडीपासून पावसाळ्याचे दिवस संपेपर्यंत म्हणजेच सप्टेंबर महिन्यापर्यंत विशाळगडावरील बेकायदेशीर बांधकामे हटविण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here