प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर :कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सर्वदूर सुरु असलेल्या पावसाने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने पंचगंगा नदीने आज इशारा पातळी गाठली. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फुट असून धोका पातळी ४३ फूट आहे. कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर आज सोमवार दि २२ जुलै सकाळी ११ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ३९ फूट इंच इतकी झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास नदी धोका पातळी सुद्धा गाठण्याची शक्यता आहे.पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू लागल्याने नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. महापुराच्या कटू स्मृती अजूनही विस्मृतीत गेल्या नसल्याने प्रशासनाकडून पंचगंगा इशारा पातळीकडे गेल्या मुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Home Uncategorized पंचगंगा नदीची इशारा पातळी ओलांडली धोका पातळीकडे वाटचाल; पूरबाधित गावातील नागरिकांना सतर्क...