कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले,

0
82

प्रतिनिधी प्रदीप अवघडे

जिल्हा परिषदेत कारवाई..हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतमधील *ग्रामविकास अधिकारी गणपत धनाजी आदलिंग (रा. कृष्णतारा अपार्टमेंट, मराठा कॉलनी कसबा बावडा* ) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. नऊ हजार रुपयांची लाच स्विकारताना अदलिंगला रंगेहाथ पकडले. जिल्हा परिषद मुख्यालयच्या इमारतीत सोमवारी, २२ जुलै रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. मुख्यालय इमारतीमध्येच लाचलुचपत प्रकरणी कारवाई झाल्याने कर्मचाऱ्यांमुळे खळबळ उडाली.या प्रकरणातील तक्रारदार हा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांनी कबनूर गावातील वॉर्ड नंबर दोनमधील वाढीव पाइप लाइन बसविण्याच्या कामाची निविदा भरली आहे.निविदेप्रमाणे कामाची विचारणा करण्यासाठी तक्रारदार काँन्ट्रॅक्टरनी आदलिंग यांची भेट घेतली. तेव्हा आदलिंग यांनी कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरकडे नऊ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सकाळी म्हणजे सोमवार 22-7-24 रोजी सापळा लावला. तक्रारदारांकडून नऊ हजाराची लाच घेताना आदलिंग यांना रंगेहाथ पकडले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक बापू साळुंखे , पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषद मुख्यालय इमारतीत ही कारवाई केली. सायंकाळच्या सुमारास ही कारवाई झाली. जिल्हा परिषदेत ग्रामसेवकांची पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. या पदोन्नती प्रक्रियेसाठी ग्रामसेवक मोठया संख्येने जिल्हा परिषदेत दाखल होते. या दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५७ वर्षीय गणपत आदलिंगवर लाच प्रकरणी कारवाई केली. या कारवाईने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. *माहिती तंत्रज्ञान बातम्या*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here