प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर: कारगिल युद्धाच्या विजयाला 25 वर्षे पूर्ण झाल्या बद्दल देशभरात आज दिनांक 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. कोल्हापुरात देखील 1 महाराष्ट्र बॅटरी, छात्र सेनेच्यावतीने , कमांडिंग ऑफिसर कर्नल मुथन्ना यांचे मार्गदर्शनाखाली, महावीर उद्यान येथील युद्ध स्मारक येथे कर्नल प्रशांत पवार, निवृत्त यांचे प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
या वेळी कर्नल पवार, कर्नल मुथन्ना,ऑननरी कॅप्टन अशोक पोवार, सुभेदार राजेश पाटील, हवालदार नंदकुमार चौगुले या कारगील युद्धातील प्रत्यक्ष सहभागी वीरांच्या हस्ते स्मारकास पुष्पचक्रे वाहण्यात आली व मृत सैनिकां प्रति 2 मिनिट स्तब्ध राहून आदरांजली देण्यात आली. या प्रसंगी महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर.पी. लोखंडे, कॅप्टन उमेश वांगदरे, श्री राजेश महाराज, लेफ्टनंट सुजाता पाटील,सुभेदार मेजर शिवाबालक यादव व 1 महाराष्ट्र बॅटरी एन.सी.सी चे अधिकारी व छात्र सैनिक उपस्थित होते.
या नंतर महावीर महाविद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अधिकारी व कारगील वीरांनी , छात्रांना प्रत्यक्ष युद्ध अनुभव कथन तसेच मार्गदर्शनपर भाषण केले. यावेळेस एन.सी.सी. छात्रांनीच कारगील युद्धावरील तयार केलेल्या माहितीपर लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले.