प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर, दि. २८ : उपविभागिय अधिकारी, करवीर यांनी कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यात आज दिनांक २८ जुलै २०२४ रोजी पुरस्थिती असल्यामुळे व ब-याच मार्गावर पाणी असल्यामुळे व वाहतूक बंद असल्यामुळे दिनांक २९ जुलै २०२४ रोजी कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवणे उचित होईल असे कळविले आहे. तसेच तहसिलदार, शिरोळ यांनी तालुक्यातील ०९ शाळामध्ये पूरबाधीत नागरीकांसाठी निवारा केंद्र तयार करण्यात आल्यामुळे नमूद ०९ शाळा बंद ठेवण्याबाबत विनंती केली आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. त्यास अनुसरून आपत्कालीन स्थितीत आवश्यकते नुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
त्यामुळे करवीर आणि शिरोळ या दोन तालुक्यात सद्यस्थितित पूरस्थिती निर्माण झाली असल्याने, जिल्हयातील करवीर व शिरोळ तालुक्यातील १. श्री. दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरूंदवाड २. तेरवाड आश्रमशाळा ३. एस.पी. हायस्कूल, कुरुंदवाड ४. एस. के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड ५. चंद्रकला बालक मंदिर, कुरुंदवाड ६. सैनिकी पॅटर्न शाळा, कुरुंदवाड ७. कुमार विद्या मंदिर, जि.प. शाळा अकिवाट ८. जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, तेरवाड ९. जिल्हा परिषद विद्यामंदिर, धरणगुत्ती या ०९ शाळा २९ जुलै २०२४ रोजी बंद ठेवणे आवश्यक आहे.त्यामुळे अमोल येडगे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोल्हापूर, यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील अधिकारान्वये जिल्हयातील करवीर तालुक्यामधील कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासह सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेमधील सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिरोळ तालुक्यातील वर नमूद ०९ शाळांना दिनांक २९ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर केली आहे, तथापी, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे आदेशात नमूद केले आहे.