कोल्हापुर : महिला भाजी विक्रेत्यांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव, मंडईमध्ये असणारा जनावरांचा उच्छाद, फेरीवाल्यांना छत नाही यासह असंख्य गैरसोयीबद्दल शिंगोशी मार्केट व परिसरातील ५० हुन अधिक फेरीवाल्यांनी बाज कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या शिष्टमंडळ फेरीवाल्यांचे नेतृत्त्व स्थानिक विक्रेता व हॉकर्स जॉईंट अॅक्शन कमिटीच्या राज्य उपाध्यक्षा सौ. निर्मला कुराडे यांनी केले.आयुक्त साधना पाटील यांनी यावेळी एक मंडईच्या समस्या सहानुभुतीपूर्वक समजून घेतल्या- ही मंडई खुल्या जागेत भरते येथील विक्रेत्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा, तसेच महिला विक्रेत्यांना स्वच्छतागृहाची सोय करण्याची गरज आहे.
मंडईमधील कचरा वेळच्यावेळी उचलणे, डास प्रतिबंधक उपाय करण्याची आवश्यक आहे. असे असताना पालिका केवळ रमाफी वसूलीचे काम करते. साफसफाई करण्याची जबाबदारी खासगी कंत्राटदारावर आहे त्यासाठी कंत्राटदार बळजबरी करून वसुली करत असतात. जर सफाई होत नसेल, आणि नर विक्रेत्यांनी फक्त सफाई करच भरायचा का? अशी विचारणा यावेळी करण्यात आली.या वसुलीसाठी पालिकेतील काही कर्मचारी दलालाप्रमाणे फेरीवाल्यांना धमकावतात.
आपल्य अधिकाराचा वापर करून धमकावण्याचा हा प्रकार थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यापैकी एका महिला कर्मचाऱ्यावर सर्व विक्रेत्यांनी गंभीर आरोप केले. यामध्ये विनामोबदला फेरीवाल्यांकडून भाजी उचलून नेणे, कागदपत्रे दाखले यासाठी जाणाऱ्या सामान्य नागरीकांना हेलपाटे मारायला लावणे यासारख्या आरोपांचा समावेश होता.