प्रदीप अवघडे प्रतिनिधी
कोल्हापूर येथे ४५ हजार रुपयांची लाच घेताना अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. अन्नसुरक्षा अधिकारी विकास रोहिदास सोनवणे (वय ५०, वर्षे, रा. लाईफ स्टाईल अपार्टमेंट, प्रतिभानगर, कोल्हापूर . मुळ गाव रा. राशीन, ता.कर्जत, जि. अहमदनगर) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी २० रोजी कारवाई करण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. या गुन्ह्यातील तक्रारदाराचे वेफर्स आणि नमकीन या खाद्यपदार्थ तयार करण्याच्या प्रकल्प आहे. या प्रकल्पाला अन्नसुरक्षा अधिकारी सोनवणे यांनी पाच ऑगस्ट रोजी भेट देऊन तपासणी केली आणि काही खाद्यपदार्थ सॅम्पल म्हणून घेऊन गेले. ताब्यात घेतलेल्या अन्नपदार्थांच्या आणि खाद्यपदार्थांच्या नमुन्यामध्ये कोणताही दोष नाही अशी कारवाई न करणेसाठी तसेच फर्मचे लायसन रद्द न करणेसाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे ४५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्रारीची खातरजमा करून पोलिसांनी आज मंगळवारी सापळा रचला तक्रारदाराकडून ४६ हजार रुपयांची लाच घेताना पोलिसांनी अन्नसुरक्षा अधिकारी सोनवणे याला रंगेहाथ पकडले. संशयित अधिकारी सोनवणे यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बापु साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदारप्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल विकास माने, सुनील घोसाळकर, सुधीर पाटील, संगीता गावडे,सचिन पाटील यांनी कारवाई केली.