कोल्हापूर, दि. २७. प्रतिनिधी: कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक म्हणून दोन वर्ष सरदार नाळे हे कार्यभार पाहत होते. सरदार नाळे यांची मुंबई येथे बदली झाली व या ठिकाणी अविनाश पोवार यांची नियुक्ती झाली होती तर वैष्णवी पाटील यांची सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. पण अविनाश पोवार यांनी नियुक्तीनंतरही आपला कार्यभार स्वीकारला नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक गजानन राठोड यांनी पोवार यांची नियुक्ती मुख्यालयात केली व वैष्णवी पाटील यांची कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्तीचे आदेश दिले. वैष्णवी पाटील यांनी पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला असून, यापूर्वी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.