* *कागल, दि. २६:*कागलमध्ये लिंगायत समाजाच्यावतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार केला. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठात महात्मा श्री. बसवेश्वर महाराज यांच्या जीवनाचा अभ्यास, त्यांचे विचार- कार्याचा प्रचार आणि प्रसारासाठी “शरण साहित्य अध्यासन” ला मंजुरी मिळाली. जिल्हा नियोजनकडून मंजूर तीन कोटी निधीपैकी दीड कोटी निधी तात्काळ वर्ग केला आहे. वीरशैव समाजाच्या मागणीला यश मिळाल्याबद्दल समस्त लिंगायत समाजातर्फे हा कृतज्ञतापर सत्कार झाला. सत्काराला उत्तर देताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सर्वात आधी बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर स्वामी यांनी समता, न्याय, मूल्य, बंधुता, एकात्मता ही लोकशाही मूल्ये रुजवली. त्यांनी स्वातंत्र्य, अधिकार, नियंत्रण, शिस्त आणि प्रशासन, सुशासन या मूल्यांचाही पुरस्कार केला होता. पालकमंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, समतेचे प्रणेते, थोर समाज सुधारक आणि महान संत, असा त्यांचा लौकिक आहे. विजापूर जिल्ह्यात इंगळेश्वर- बागेवाडी येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षापासून कृष्णा व मलप्रभा नद्यांच्या संगमावर असलेल्या कुडलसंगम येथे अध्ययन केंद्रात त्यांचे बारा वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म व तत्वज्ञानाचा अभ्यास केला. स्त्री- पुरुष भेदभाव, जातीभेद यासारख्या गोष्टींना त्यांनी कडाडून विरोध केला. श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, महात्मा बसवेश्वर स्वामी यांचा विवाह मंगळवेढ्याच्या मामाच्या मुलीशी झाला. विवाहानंतर ३१ वर्षे ते मंगळवेढ्यात होते. तिथे त्यांनी “लोकशाही संसद म्हणजेच अनुभव मंडप” ची स्थापना केली. सर्व धर्मीयांचा या संसदेत समावेश होता. त्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढीपरंपराना त्यांनी विरोध केला. यावेळी संजय चितारी, सुनील माळी, सौरभ पाटील, योगेश गाताडे, सुहास हिंगे, विष्णू कुंभार, बाळासाहेब माळी, अमोल माळी, शिवाजी पवार, सुमित पाटील, शिवकृपा मेडिकल पाटील व सर्व लिंगायत समाज कागल आदी प्रमुख उपस्थित होते…कागल: कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये महान संत, थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर स्वामी यांच्या जीवनकार्याच्या, विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी “शरण साहित्य अध्यासन” ला तीन कोटी निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार समस्त कागल लिंगायत समाजाच्यावतीने झाला.
Home Uncategorized कागलमध्ये लिंगायत समाजाच्यावतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कारशिवाजी विद्यापीठात शरण साहित्य अध्यासन...