न्यू मॉडेल च्या माजी खेळाडूंच्या हस्ते ध्यानचंद यांचे प्रतिमा पूजन करून क्रीडा दिन साजरा.

0
32

कोल्हापूर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये 29 ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या वेळेला कॉलेजच्या माजी विद्यार्थी नी.ज्ञानेश्वरी पाटील( राष्ट्रीय नेमबाज )आणि सिद्धी राज्याध्यक्ष (राष्ट्रीय कराटेपटु )यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमा पूजन करून करण्यात आला. यावेळी सायन्स विभाग प्रमुख प्रा. अनिल जाधव.कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. सागर पाटील. कल्चरल विभाग प्रमुख प्रा. संदीप कदम. यांच्यावतीने मेजर ध्यानचंद यांच्या कार्याबद्दलची माहिती भाषण स्वरूपात सांगण्यात आली. कार्यक्रमाला कॉलेजचे सर्व खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिमखाना विभाग प्रमुख डॉ. महेश अभिमन्यू कदम.यांनी केले.माननीय संपादकसो. वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही नम्र विनंती.डॉ .महेश अभिमन्यू कदम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here