प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर :यशस्वी मंच आयोजित दिनांक 3 सप्टेंबर 2024 दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या वेळेत शाहू स्मारक भवन मिनी हॉल, दसरा चौक, कोल्हापूर येथे खेळ मंगळागौरीचा” आणि “मी मराठमोळी वेशभूषा स्पर्धा” 2024 मोठ्या दिमाखात संपन्न झाली. या कार्यक्रमामुळे विविध स्पर्धां आयोजित करण्यात आल्या होत्या मंगळागौर, झिम्मा- फुगडी, रॅम्प वॉक, नाथीचा नखरा आणि नऊवरीचा ठसका,तसे उखाणे,मॉम विथ किड्स रॅम्प वॉक,किड्स रॅम्प वॉक,बेस्ट लुक, स्पॉट गेम्स,लकी ड्रॉ आणि बरेच काही आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचा सर्व महिलांनी आनंद लुटला. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यशस्वी मंच सदैव तत्पर असते. महिलांच्या मधील विविध कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ हे यशस्वी मंच आहे. या यशस्वी मंचाच्या संस्थापक स्वप्नाली जगोजे व मोहिनी वनकुंद्रे या महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. महिलांसाठी व्यासपीठ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अरुंधती महाडिक, भागीरथी महिला संस्था अध्यक्षा या उपस्थित होत्या. या कार्यक्रमा वेळी प्रमुख उपस्थित अलका बारडे सोनाई फर्निचर मॉल आंबेवाडी कोल्हापूर, दीपिका जाधव संचालिका भरारी महिला फाउंडेशन, मनस्वी पाटील एसबीआय बँक लाइफ इन्शुरन्स डेव्हलपमेंट मॅनेजर, सायली पाटील प्राईम इस्टेट कोल्हापूर हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक स्वप्नाली जगोजे संस्थापक अध्यक्ष यशस्वी मंच व मोहिनी वनकुंद्रे संस्थापक अध्यक्ष यशस्वी मंच या होत्या. यशस्वी मंच हे अल्पावधीत महिलांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळख निर्माण करत आहे. या यशस्वी मंच तर्फे विविध उपक्रम आयोजित केले जातात. असंख्य महिलांच्या उपस्थितीमध्ये खेळ मंगळागौरीचा” आणि “मी मराठमोळी वेशभूषा स्पर्धा” 2024 संपन्न झाली. या कार्यक्रमाचे मीडिया पठार म्हणून SP-9 मराठी न्युज चॅनल व तारा न्यूज यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी गिफ्ट पार्टनर म्हणून रॅक्सन ग्रुप, वनकुंद्रे ब्रदर्स आणि कंपनी, मोहिनी पैठणी ग्रुप हे होते. महिलांच्या उदंड प्रतिसादामुळे हा कार्यक्रम आनंदात व उत्साहात पार पडला.