प्रतिनिधी मेघा पाटील
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः आयुष्याला आकार आधार अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रत्येक गुरुवर्यास शतशा नमन, *निरोगी आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली** जिथे कमी तिथे आम्ही या ऊक्तीवर चालणाऱ्या **नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक** व श्रीराम आय क्लिनिक डॉक्टर अर्पित शहा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक दिनी न्यू एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय उंटवाडी त्रिमूर्ती चौक येथे विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी **मोफत* नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते . विद्यालयातील पन्नास हून अधिक शिक्षक व इतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्याचा लाभ घेतला. पालक शिक्षक संघातर्फे सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिबिरास डॉक्टर अर्पित शहा यांनी मार्गदर्शन केले .संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल देव यांनी अशी शिबिरे ग्रामीण भागात व गरजूंसाठी घेण्याचे मानस व्यक्त केले,उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली, व प्रसिद्ध गायिका मृदुला देव यांच्या उपस्थितीत पालक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे,उपमुख्याध्यापक रविंद्र हात्ते,
पर्यवेक्षक सूर्यभान जगताप,पर्यवेक्षिका मनिषा देशपांडे , शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर ,पालक शिक्षक उपाध्यक्षा माता पालक संघ उपाध्यक्षा गायत्री लचके , पा शि संघ सचिव अरूणा साळुंखे, पा शि संघ अध्यक्षा योगिनी सासे, परिवहन समिती सदस्या अलका येवले, पा शि संघ सदस्य भारती बुणगे, दिलीप चव्हाण, महादू हुजरे , दिलीप रौंदळ , संदीप देव , सुरेखा वाणी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी ,उपस्थित होते. संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी चक्रधर स्वामी जयंती साजरी करण्यात आली व त्यांना अभिवादन करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री लचके यांनी केले व पाहुण्यांचा परिचय करून दिला .पा शि संघ कार्यवाह प्रविण जाधव यांनी प्रास्तविक केले. यादी वाचन अरूणा साळुंखे, भारती बुणगे, महादू हूजरे यांनी केले .आभार दिलीप चव्हाण यांनी मानले. विद्यालयाच्या गृहसभा विभागाच्यावतीने विद्यार्थी शिक्षक यांनी अध्यापनाचे कामकाज केले. व शिक्षक होण्याचा अनुभव घेतला. कार्यक्रम पार पडण्यासाठी अलका येवले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.