निपाणीजवळ तवंदी घाटात कंटेनर-कारचा भीषण अपघात, 3 ठार

0
96

प्रतिनिधी प्रदीप अवघडे

तवंदी घाटात भीषण अपघाताची घटना सांयकाळी घडली. कंटेनर, फोर व्हीलर आणि टू व्हीलर ची एकमेकांना धडक बसून विचित्र आणि तितकाच भीषण अपघात घडला रस्ते वाहतुकीत मोठी वाढ झाल्याने वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. त्यामुळे, सातत्याने अपघाताच्या घटना घडताना दिसून येतात. वाहनाचा स्पीड आणि खराब व अरुंद रस्त्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळते. पुणे-बेंगलोर महामार्गावर निपाणी जवळील तवंदी घाटात भीषण अपघाताची घटना सांयकाळी घडली. कंटेनर, फोर व्हीलर आणि टू व्हीलर ची एकमेकांना धडक बसून विचित्र आणि तितकाच भीषण अपघात घडला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here