बांबवडे पोलीस चौकीचा दारात पोलिसां समक्ष एकावर चाकू हल्ला…

0
29

शाहूवाडी /प्रतिनिधी: बांबवडे पोलीस चौकीचा दारात पोलिसांसमक्ष एकावर चाकू हल्ला झाला असून यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत प्राथमिक उपचारानंतर या तिघांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बांबवडे तालुका शाहुवाडी येथे वडापाच्या गाडीचा धक्का लागला असे विचारल्यावर बाचाबाची झाली यानंतर बांबवडे पोलीस चौकी तक्रार देण्यासाठी गेले असता त्यातील एकाने दीपक सर्जेराव हांडे यास पोलीस चौकीच्या दारातच चाकू मारला आहे त्यामध्ये दीपक गंभीर जखमी झाला आहे तसेच इतर मंडळींनी दीपक सोबत असणाऱ्या वर देखील हल्ला केला या हल्ल्यात दीपक सह सुभाष व संदीप हांडे हे देखील जखमी झाले आहेत दरम्यान याबाबत प्रवीण जानकर व सहकारी यांना शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेचा शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे अधिक तपास करीत आहे तसेच या वादात विशाल गुंगा जानकर व गुंगा गोपाळ जानकर हे देखील जखमी झाल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here