नेहरू हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक सर यांचे निधन

0
18

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर : नेहरू हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक सर यांचे निधनकोल्हापूर दि. दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लीम बोर्डिंग) कोल्हापूर संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक व विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री. इनामदार एच.ए. यांचे बिजापूर कर्नाटक या ठिकाणी अल्पशा आजाराने निधन झाले. स्वर्गीय संस्थेचे पदाधिकारी ,शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण केली. अल्लाह चरणी त्यांच्या करिता दुआ करणेत आली .स्वर्गीय इनामदार सरांनी आपल्या कार्यकाळात एकही रजा घेतली नाही. त्यांनी आपले संपूर्ण जीवन विद्यार्थी व शाळेसाठी समर्पित केले तसेच त्यांचे अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत असे उदगार चेअरमन मा.गणी आजरेकर यांनी व्यक्त केले.संस्थेचे प्रशासक मा.हाजी कादरभाई मलबारी यांनी स्वर्गीय इनामदार सर यांनी शाळेच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. या प्रसंगी शालेय समिती चेअरमन श्री. रफीक शेख यांनी स्वर्गीय इनामदार सर यांच्या आठवणींना उजाळा दिला. संस्थेचे संचालक हाजी लियाकत मुजावर , हाजी जहाँगीर अत्तार, रफीक मुल्ला , अल्ताफ झांजी , मलिक बागवान , फारूक पटवेगार व मुख्याध्यापक श्री. ताशिलदार एम.एम.उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here