प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि प्रदीर्घ संघर्षानंतर कोल्हापूरकरांसाठी वंदे भारतची मागणी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत १६ सप्टेंबरपासून धावणार आहे. गेल्या आठवडाभरापासून पुणे हुबळी वंदे भारतला प्रस्तावित कोल्हापूर थांबा झाल्यानंतर वाद वाढला होता. त्यानंतर कोल्हापूर सांगलीसह कर्नाटकमधील लोकप्रतिनिधी तसेच प्रवासी संघटनांनी हस्तक्षेप केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून कोल्हापूर ते पुणे आणि हुबळी ते पुणे अशा दोन स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दिला. येत्या सोमवारपासून म्हणजेच १६ सप्टेंबरपासून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. असे असेल वेळापत्रक?कोल्हापूर ते पुणे वंदे भारत प्रत्येक मंगळवार, शनिवार व सोमवारी धावणार पुणे ते कोल्हापूर वंदे भारत प्रत्येक बुधवार, शुक्रवार व रविवारी धावणारअशी धावणार कोल्हापूर-पुणे वंदे भारतकोल्हापूर ते पुणे वंदे भारत सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापुरातून निघेल.मिरजमध्ये 9 वाजता, सांगलीत सव्वा नऊ वाजता, किर्लोस्करवाडीत 9.42 मिनिटांनी कराडला 10.07, सातारा 10.47 आणि पुण्यात दीड वाजता पोहोचेल.पुण्यातून परतणारी गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल. साताऱ्यात 4.37 कराड 5.25, किर्लोस्करवाडीत 5.50, सांगली 6.18, मिरजेत 6.40 तर कोल्हापुरात 7.40 ला पोहोचेल.